वात्सल्य

बेवारस मुक्या पिलाला सांभाळा

श्रीगोंदयातील रस्त्याचे कामे चालू आहेत, रस्त्यावर डांबर टाकणे चालू ,त्यामध्ये एक कुत्र्याचे पिलू पूर्ण फसले आणि कसेबसे एका जिन्याखाली भिंतीच्या उबेला जाऊन बसले पण ते त्या भिंतीला चिटकून बसले त्याला बिलकुल हलता येत नव्हते ,ते श्रीकांत चोध या प्राणी मित्राने पाहिले आणि वात्सल्य संस्थेला फोन केला .आम्ही तिथे गेलो तर त्याची खूप बेकार अवस्था होती . अंदाजे 2 ते 3 दिवस झाले असावेत चिटकून बसलेले .ओरडून ओरडून त्याचा घसा बसला होता,तोंडाला कोरड पडली होती . खूप वेळेनंतर त्याला कसेबसे बाहेर काढले .नंतर त्याला अंघोळ घातली 2 दिवस अंघोळ घातल्यानंतर तो छान झाला .3 दिवस प्रशांत लवांडे यांनी त्याचा सांभाळ केला .आणि त्या छोट्याश्या पिल्लाचे पुन्हा रस्त्यावर हाल होऊ नये म्हणून त्याला एक हक्काचे घर शोधले .सुरेश दांडेकर यांना विनंती केली की या बेवारस मुक्या पिलाला सांभाळा ,आणि त्यांनी त्याला स्वतःच्या घरी नेले .