आमचे मित्र कुलकर्णी साहेबांचा फोन आला की माझ्या घराच्या जवळ एक गाभण गाई व्ययला झाली आहे,आणि त्याचे बाळ काही बाहेर येत नाही. तिला खूप त्रास होत आहे तुम्ही लवकर या ,वात्सल्य परिवार या कामासाठी नेहमी तत्पर असतो.आम्ही गेलो तिला वेण्यासाठी प्रयत्न केले त्या वासराचा जीव गुदमरला होता . त्याचा जीव वाचेल का नाही याची शाश्वती नव्हती पण थोडावेळ
गेल्यानंतर ते वासरू नॉर्मल झाले . कुलकर्णी कुटुंबाचे आम्ही खूप आभारी आहोत कारण तिला वाचवण्यासाठी त्यांनी फोन केला आणि दिवसभर ते सर्वजण त्या गाईला राखण बसले होते .कारण त्या वासराला कुत्र्यांनी चाऊ नये . ती सुखरूप बाळंतीण झाली याचा खूप आनंद झाला………..
