श्रीगोंदा शहरात फिरणाऱ्या गाईला पुन्हा एकदा जीवदान …….
गावात फिरणारी गाई भिंतीला, झाडाला ,धडका घेताना काही प्राणीमित्र नी पाहिले .तिला पाहिल्यावर असे वाटत होते की ती पिसाळली आहे तिला जेव्हा महंमद महाराज पटांगणात आणली आणि खांबाला बांधून जवळ जाऊन पाहिले तेव्हा समजले की ,नायलॉन चा दोरीचा फास तिच्या शिंगाभोवती असलेला आढळून आला ,नायलॉनची दोरी 1 इंच आत खचली गेली होती ,आणि त्यामुळे खोल जखम होऊन त्यामध्ये अळया झाल्या होत्या .जवळ जवळ 10 दिवसापेक्षा जास्त दिवसाची जखम झाल्या मुळे तिला खूप त्रास होत होता तो खचलेला दोर जेव्हा कापून काढला तेव्हा त्या जखमेतून आळ्या बाहेर येऊ लागल्या .ती जखम जेव्हा स्वच्छ केली तेव्हा तिला खूप अराम वाटला ,आणि ती शांत बसून राहिली.श्रीगोंदयातील ग्रामदैवत संत महंमद महाराजांच्या पटांगणात बेवारस गाईला जीवदान देण्याची
ही तिसरी वेळ आहे . वात्सल्य संस्था या प्राण्यांसाठी नेहमी मोफत उपचार करते हे सर्वांना माहीतच आहे . तिथे उपचार करताना 25 ,30 तरुण वर्ग मदतीला होता . त्यांनी अश्या गाईंच्या उपचारा साठी 1000 रुपयांची मदत देखील केली . अशीच सहानुभूतीची आणि आर्थिक मदतीची गरज पूर्ण केल्या बद्दल वात्सल्य परिवार सहकार्य करणाऱ्या तरुण मित्रांचा आभारी आहे ,
