आपले श्रीगोंदा शहर संतांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ,अश्या श्रीगोदा शहरातील बेवारस मोकाट फिरणाऱ्या फिरणाऱ्या बैलाच्या पोटात सुरा खुपसवला .आपल्याला साधी ठेच लागली तरी किती वेदना होतात ,आणि त्या मुक्या प्राण्यांच्या वेदना पाहून मन सुन्न झाले.का असे वागतात लोक कळत नाही .निसर्गाने जसे तुम्हाला जन्माला घातले तसेच त्या जिवांना ही तेवढाच अधिकार आहे .तो आपण का बर हिसकावून घेतो आहोत . मन हेलावणारी गोष्ट आहे .जगात भारत महान ,भारतातील महाराष्ट्राची संस्कृती उत्कृष्ट असे आपण म्हणतो आणि हाडा मासाने बनलेली माणसे एखाद्या मुक्या प्राण्यांच्या जीवावर उठतात,त्याला त्रास देतात तेव्हा खूप वाईट वाटते .
