जामखेड रोड वर या कुत्र्याला गाडीने धडक दिली, त्याच्या हाडाला मार लागला होता त्याचा जीव वाचवण्यासाठी वात्सल्य पशुसेवा संस्था ला काही प्राणी मित्र चे फोन आले आम्ही तिथे गेलो तर त्याच्या मागच्या पायावरून गाडी गेली होती त्याच्या वेदना पाहून खूप वाईट वाटत होते त्याला वाचवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात वात्सल्य संस्था गेली १२ वर्षांपासून मुक्या व बेवारस भटक्या जनावरांसाठी कार्य करत आहे संस्थेला मदतीचा हात देण्यास जरी कानाडोळा केलात तरी चालेल परंतु असा मुका जीव जेव्हा संकटात असतो तेव्हा कृपा करून त्या प्राण्यांकडे दुर्लक्ष करू नका त्याचा आणि आपला जीव हा सारखाच आहे
