त्या बैलाला आता आराम पडला आहे.त्याची जखम बरी होत आली आहे. या बैलाच्या उपचारा साठी बजरंग दलाचे श्रीगोंदा कालिदास कोथिंबीर,अमोल हिरणावळे,या कार्यकर्त्यांनी त्या मुक्या जनावराच्याउपचारा साठी सर्व औषधाची मदत केली.वात्सल्य परिवार त्यांचा खूप खूप आभारी आहे अश्या बेवारस मुक्या प्राण्यांना मायेची, आधाराची गरज असते.तो बेवारस बैल एवढा मारका होता .आता तो आम्हाला मारत नाही .आम्ही सगळे जेव्हा त्याच्या जवळ जातो तेव्हा तो आम्हाला जवळ बोलावतो .त्याची जखम स्वच्छ करायला शांत उभा राहतो. त्याला बरा होताना पाहून आनंद गगनात मावत नाही.
